Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !

Spread the love

लाईव्ह मराठी संहिता , संगिता पवार प्रतिनिधी : Employee News :  महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सोबत सेवानिवृत्तीची वय वाढविण्याबाबत अभ्यास समितीस तज्ञांकडून सल्ला देण्यात आला आहे . यानुसार सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्षे करणेबाबत तज्ञांकडून मत मांडण्यात आले आहेत .

महाराष्ट्र राज्‍य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक तसेच सामाजिक सुरक्षा मिळावी याकरीता राज्य शासनांकडून अभ्यास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे , या अभ्यास समितीकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येत असून कर्मचारी संघटना व तज्ञांकडून मत मागविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा होणार !

यानुसार कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या मतानुसार जुनी पेन्शनमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नसल्याचे मत मांडण्यात आलेले आहेत . तर तज्ञांकडून अनेक मत मांडण्यात आलेले आहेत , यापैकी सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे केल्यास कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ घेण्यासाठी तब्बल 7 वर्षे सेवेत रहावे लागतील .

ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लगेच द्यावे लागणाऱ्या खर्चांमध्ये तब्बल 20 टक्क्यांची बचत होईल .असे मत तज्ञांकडून मांडण्यात आलेले असून यास अनेकांकडून विरोध देखिल दर्शविला जात आहे कारण सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यास निश्चित बेरोजगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल .

Leave a Comment