राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.14 मार्च 2023 ते दि.20 मार्च 2023 या दरम्यानच्या संप काळातील कर्मचाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी , खाती शिल्लक असलेल्या देय / अनुज्ञेय रजा मंजुर करुन नियमित करण्याबाबत , सुधारित शासन निर्णय पारित करणेबाबत महाराष्ट्र राज्य रापपत्रित अधिकारी महासंघाकडून दि.31 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र सादर केले आहे .
राज्यातील कर्मचाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागु करावी , या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व त्यांच्या समन्वय समितीने दि.14 मार्च 2023 ते दि.20 मार्च 2023 या कालावधीत अभूतपूर्व एकजुटता दाखवून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्यात आले आहे . अधिकारी महासंघाने देखिल जुनी पेन्शन लागु करण्यासाठीच्या या मागणीस प्रखर पाठिंबा दर्शविला होता .
तसेच राज्याचे मुख्यमंत्री , मा उपमुख्यमत्री यांनी राज्यातील गारपीटगृस्त स्थिती तसेच आरोग्य , शिक्षण व इतर महत्वाच्या व्यवस्था प्रभावित होवू नयेत यास्तव आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते .त्याचबरोबर , जुनी पेन्शन योजना लागू करण्या संदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे देखिल आश्वासन दिल्यानंतर दिनांक 20.03.2023 रोजी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बेमुदत पुकारलेला संप मागे घेतला .
त्या अनुषंगाने सवंकरी कर्मचाऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होवू देणार नाही , असे देखिल राज्य शासनांकडून आश्वासित करण्यात आले होते . तसेच संदर्भाधिन शासन निर्णयान्वये संप काळातील अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावी . अशा निर्णयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा अनादर झाल्याची तिव्र भावना झाली .
यानुसार सपंकरी कर्मचाऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होवू न देण्याच्या शासन आश्वासनाचे पालन झाले नसल्याची बाब स्पष्टपणे राज्य शासनाला सदर पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात येत आहेत .तरी आश्वासित केल्याप्रमाणे , संप काळातील अनुपस्थित कालावधी नियमित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या खाती शिल्लक देय / अनुज्ञेय रजा मंजूर करण्यात यावे असा सुधारित शासन निर्णय निर्गमित करून सुधारित शासन निर्णय तात्काळ पारित करावी अशी विनंती करण्यात आलेली आहे .
कर्मचारी विषयक ,पदभरती / योजना व ताज्या अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !