राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नियमांमध्ये सुधारणा आता सेवानिवृत्ती दिनांकापुर्वीच देण्यात येणार सेवानिवृत्ती !

Spread the love

मुंबई प्रतिनिधी , राहुल पवार : राज्य शासन सेवेतील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनांकडून कड कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहेत . अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या सेवानिवयमांनुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदतपुर्व सेवानिवृत्तीची तरतुद करण्यात आलेली आहे .

परंतु या नियमांचे काठेकोरपणे पालन करण्यात येत नव्हते , परंतु आता राज्य शासनांकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची राज्य शासनांकडून देण्यात आलेली आहे , यामुळे आता अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा आहेर मिळणार आहे .

मुदतवपुर्व सेवानिवृत्तीचा नियम नेमका काय आहे ?

महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नियम 10 ( 4 ) आणि नियम 65 नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या  वयाच्या 50 /55 वर्षांनंतर अथवा सेवेच्या 30 वर्षानंतर कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रपात्रता आजमविण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .यानुसार जे कर्मचारी कार्यक्षम असतील अशाच कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे चालु ठेवण्यात येतात , तर अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडीत करण्यात येतात म्हणजेच मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्यात येतात .

शासन सेवेत अकार्यक्षम असतील अशा कर्मचाऱ्यांमुळे सेवा बजावत असताना कामामध्ये व्यत्यय / कमीपणा येवू नये याकरीता राज्य शासनांच्या नियमांनुसार कठोररित्या पालन करणे आवश्यक असल्याचे माजी प्रशासकीय अधिकारी श्री.एन पी.मित्रयोत्री यांनी सांगितले आहे .

Leave a Comment