GOOD News : राज्य कर्मचाऱ्यांना 38% वरुन 42 % DA वाढीची तारिख झाली निश्चित !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 38 टक्के वरुन 42 टक्के पर्यंत वाढ करणेबाबत तारिख निश्चित करण्यात आलेली आहे . या संदर्भात राज्य शासनांकडून अधिकृत्त शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात येणार आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने लागु केल्याप्रमाणे डी.ए वाढ लागु करण्यात येणार असून , माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढीचा दर हा 4 टक्के म्हणजेच माहे जानवोरी 2023 पासून प्रत्यक्ष डी.ए हा 42 टक्के दराने लागु करण्यात येणार आहे .या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर आलेली आहे .

सध्या कर्मचारी संघटनांची राज्याचे मुख्यमंत्री सोबत आयोजित बैठकीमध्ये डी.ए वाढीसंदर्भात देखिल चर्चा झाल्याने , डी.ए वाढीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याने , पुढील महिन्यांच्या वेतन देयक / पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष डी.ए वाढ लागु करण्याची मोठी शक्यता आहे .

सदर डी.ए वाढीचा लाभ राज्यातील सर्वच शासकीय , अनुदानित शाळांमधील कर्मचारी , जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना प्रत्यक्ष डी.ए वाढ डी.ए फरकासह लागु करण्यात येईल .

Leave a Comment