राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4% वाढीव महागाई भत्ता देणेबाबत आत्ताची मंत्रालयीन महत्वपुर्ण अपडेट ! जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून आणखीण चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे , सदरची डी.ए वाढ माहे मार्च महिन्यांपासून प्रत्यक्ष वाढ करणेबाबत केंद्राने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे .

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए अदा करणेबाबत विविध कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा करण्यात आलेला आहे .यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची मोठी अपडेट मिडीया रिपोर्ट नुसार समोर येत आहे .

सदर डी.ए वाढीमुळे कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के म्हणजेच एकुण 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात येईल .सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डी.ए लागु आहे , तर यामध्ये आणखीण 4 टक्के वाढ झाल्यास , एकुण 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु होईल .

हे पण वाचा : Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आणखीन 8 हजार वाढ ! जाणून घ्या सविस्तर !

केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव डी.ए तसेच महागाई भत्ता फरक अनुज्ञेय करण्यात येणार आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ मिळणार आहे .

कर्मचारी विषयक , पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment