राज्य कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन , मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन लागू करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

राज्य शासन सेवेतील राष्ट्रीय पेन्शन योजना / परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन ,मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन योजना लागू करणे संदर्भात , वित्त विभाग कडून दिनांक 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेले व यापुढे शासकीय सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत त्यांची कायम निवृत्तीवेतन लेखा क्रमांक प्राण मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तीवेतन निधी विनियम व विकास प्राधिकरण यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा कार्यालय प्रमुखाकडे मागणी सादर करणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत विकल्प देणे बंधनकारक असणार आहे तसेच यापुढे शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपरोक्त विकल्प शासन सेवेत नियुक्त झाल्यावर आठ दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक असणार आहे

कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन मृत्यू उपदान या संदर्भातील विद्युत भागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment