वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

लाईव्ह मराठी संहिता , राहुल क्षिरसागर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन बाबीकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे मार्च 2023 चे वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता , व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.21.04.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे मार्च 2023 चे वेतन व महागाई भत्ता फरक करीता अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत सहपत्रान्वये शासनास विनंती केली होती . यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीत केलेल्या निधी मधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे मार्च 2023 चे वेतन , अतिकालिक भत्ता व महागाई भत्ता करीता अनुदान वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधिन होती .

यानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई कार्यालयासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण , समाज कल्याण , इतर कार्यक्रम , राज्य अल्पसंख्याक आयोग , सहायक अनुदाने या लेखाशिर्षा अंतर्गत एकूण 92,09,000/- इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे .

सदरची तरतुद सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई यांच्याकडे सुपुर्द करण्यात येत असून याकरीता अवर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी तर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई हे नियंत्रक आयोग मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी तर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत .

या संदर्भातील अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.21.04.2023 रोजी निर्गमित  झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

स्त्रोत – https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

Publish by : Siddharth pawar , livemarathisanhita

Contact : [email protected]

Leave a Comment