सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची बाहेरची कमाई ,भरमसाठ पगार ! त्यांना पेन्शनची काय गरज ? – आ.संजय गायकवाड !

Spread the love

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्य बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन कर्मचाऱ्यांचा खुप खालच्या भाषेत भाष्य करुन अपमानीत करण्यात आलेले आहे . यामुळे आमदर संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी राज्याचे विधानसभा अध्यक्ष , राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहेत .

सध्या राज्य शासनाच्या सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार श्री.संजय गायकवाड यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दि.14 मार्च 2023 पासून सुरु असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभुमीवर लोकमत न्युज चैनलला मुलाखत देताना संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबाबतचा न्यूजच्या बातमीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे .

जुन्या पेन्शनसाठी आंदालन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा सत्ताधारी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अपमान केलेला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार असून 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची बाहेरची कमाई आहे .असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे .सरकारी कर्मचारी गडगंज असून , त्यांना पेन्शनची गरज नाही .

सरकारी कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता लाभ ! वित्त विभागाचा निर्णय !

सरकारी कर्मचाऱ्यांचे शिपाई सुद्धा भ्रष्टाचार करीत असतो तो शेतकऱ्यांकडे पैसे मागतो , सरकारी कर्मचाऱ्यांनी एक रुपया सुद्धा कोणाकडून घेणार नाही असे वचन द्यावे , व नंतर पेन्शनची मागणी करावी असे सुद्धा विधान त्यांनी केले आहे .

त्याचबरोबर पुढे त्यांनी असेही म्हणाले आहे कि , सरकारी कर्मचारी काय काम करतो , सरकारला लुटायचे सरकारचे पैसे खायचे , योजना गडप करायच्या , लोकांना त्रास द्यायचा , शेतकऱ्यांना त्रास द्यायचा अशी टिका कर्मचाऱ्यांवर केल्याने राज्य सरकारी गट -ड ( चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ ,महाराष्ट्र यांच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा निषेध म्हणून राज्याचे विधानसभा अध्यक्ष , राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून निषेध नोंदविला आहे .

कर्मचारी विषयक , पदभरती , शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment