संपकाळामध्ये कर्मचाऱ्यांनी काय करावे , काय करु नये ! वाचा सविस्तर संप मार्गदर्शक सुचना !

Spread the love

सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी संप सुरु आहे , संप काळामध्ये कर्मचाऱ्यांनी काय करावे काय करुन नये याबाबत काही मार्गदर्शक सुचना कर्मचारी सेवा नियमानुसार नमुद आहेत .कर्मचारी सेवा नियमांनुसार संपकाळामधील मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे पाहुयात .

संप काळांमध्ये काय करावे ?

सर्व प्रथम आपण संपामध्ये सहभाग घेत असल्याबाबत कार्यालय प्रमुखांना कळविणे आवश्यक आहे .तसेच आपल्या कडे असणारी जबाबदारी उदा.कार्यालयाची चावी आपल्या वरिष्ठांकडे सुपुर्त करण्यात यावे . आपले दैनिक अभिलेख / दस्ताऐवज आपल्या कार्यालयांमध्येचे ठेवावे .संपकाळामध्ये घरी न बसता संपाच्या ठिकाणी आपण उपस्थित असणे आवश्यक आहे .

संप कालावधीमध्ये आपण कामावर नसल्याने , प्रशासनाच्या सर्वच कामावर बहिष्कार टाकावा .आपण ज्या संघटनेच्या वतीने संपामध्ये सहभागी झालो आहे . त्या संघटनेकडून मिळणाऱ्या सुचनांचे पालन करावे .ज्यावेळी संप मागे घेण्यात येईल त्यावेळी लगेच आपल्या कामावर हजर व्हावे .ज्या दिवशी व ज्या वेळी कामावर हजर झाले त्या दिवसांची सही करावी .

संप काळांमध्ये काय करु नये ?

संपामध्ये सहभागी होत असताना , किरकोळ रजा , अर्जित रजा अथवा अन्य कोणत्याही रजेचा अर्ज देवू नये . आपल्या कार्यालयातील कोणतेही काम करु नये .कामकाज विषयक कोणतही माहिती संपकाळामध्ये यंत्रणेचा देवू नये .संप म्हणजे सुट्टी नसल्याने या कालावधीत कोणत्याही गावाला / पर्यटनास जावू नये .

मार्चात लहान मुलांना / वृद्ध आजारींना आणू नये .दवाखाने , मा.न्यायालये व अन्य प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ध्वनीप्रक्षेपक वापरु नये .धरणे / निदर्शने , मोर्चात भाषण देताना कोणत्याही व्यक्ती विशेषणाचा वा संवैधानिक पदाचा अपमान होईल असे वक्तव्य करु नये .प्रसिद्धी माध्यमांसमोर संघटनेच्या प्राधिकृत पदाधिकाऱ्यांशिवाय अन्य कुणीही व्यक्त होवू नये.संप मागे घेतल्यानंतर आपल्या कार्यालयात रुजु झाल्याशिवाय परस्पर सुट्टी घेवू नये .संप मागै घेतल्यानंतर रुजु होताना , संप होताना संप काळातील दिवसांची उपस्थिती पत्रकात स्वाक्षरी करु नये .

कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment