राज्य शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्याने , राज्य कर्मचाऱ्यांचे काल दि.14 मार्च 2023 पासून संप सुरुच आहे . जोपर्यंत राज्य सरकार जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेणार नाही . तोपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असणार आहे , असे कर्मचाऱ्याची संघटनेने स्पष्ट केले आहे .
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यातील संपकरी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .याबाबत संघटनेकडून दि.14.03.2023 रोजी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे .सविस्तर पत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
या पत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहे कि , दि.14 मार्च 2023 पासून सरकारी , निमशासकीय कर्मचारी , व शिक्षक संघटना समन्वय समिती , यांनी जूनी पेन्शन बेमूदत संप पुकारलेला आहे .संपामध्ये सहभागी झालेल्या सर्व सरकारी , निमशासकीय कर्मचारी , व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत .
जो पर्यंत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने कडून मागण्या मान्य झाले बाबत व संप मिटल्या बाबत अधिकृतपणे कळविण्यात येत नाही . तो पर्यंत कोणीही कर्तव्यावर हजर होवू नये , संपादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमा बाबत संघटनेकडून वेळोवेळी कळविण्यात येईल .अशा सूचना संपकरी कर्मचाऱ्यांना संघटनेकडून देण्यात आलेल्या आहेत .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रूपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !