अखेर जुनी पेन्शन संपाबाबत राज्य सरकार नरमले ! कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन मागणीकरता ,राज्य सरकारकडून तात्काळ बैठकीचे आयोजन !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा दि.14 फेब्रुवारी 2023 पासून राज्यव्यापी संप होणार आहे . या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे . या बैठकीसंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बैठकीची सुचना निर्गमित करण्यात आलेली आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन व इतर मागण्यांबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचे दि.24.02.2023 च्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून बैठकीचे आयोजन करण्यात येत आहेत .

सरकारी -निमसरकारी , शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या मागण्यांबाबतचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी दि.24 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेले निवेदनानुसार राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या मागण्यांसाठी दि.14.03.2023 रोजी पासून राज्य कर्मचारी बेमुदत संप आंदोलन पुकारणार असल्याबाबत राज्य शासनास नोटीस प्राप्त झालेली आहे .

संघटनेने दिलेल्या निवेदनातील प्रलंबित मागण्यांबाबत मा.मुख्य सचिव महोदय यांचे समवेत दि.10.03.2023 रोजी दुपारी 12.00 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली होती .या बैठकीत ठरल्या नुसार सदर संघटने सोबत सोमवार दि.13.03.2023 रोजी 11.00 वाजता मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे .सदर बैठकीमध्ये निवदेनातील विविध मागण्यांमधील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment