मोठी खुशखबर : या कर्मचाऱ्यांना मिळणार चक्क तीन वर्षांची वेतन थकबाकी , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.29.03.2023

Spread the love

राज्य शासनाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी वेतन अनुदानाची प्रतिपुर्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.29 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय ( gr ) पुढीलप्रमाणे पाहुयात .

बृहन्मंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार सन 2018-19 ते सन 2022-23 मधील पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी अनुज्ञेय वेतन अनुदान व मागील काही वर्षासाठीचे थकीत वेतन अनुदान असे एकुण एकशे सत्याण्णव कोटी बासष्ट लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास रुपये फक्त इतकी रक्कम अनुज्ञेय आहे .

संबंधित लेखाशिर्षाखाली सन 2022-23 मध्ये अर्थसंकल्पीत अंदाजात रुपये 34,22,40,000/- रुपये इतकी तरतुद मंजुर असून सुधारित अंदाजात सदर तरतुद कायम आहे . यानुसार बृहन्मुंबई महापालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी चौत्तीस कोटी बावीस लाख चाळीस हजार रुपये इतके वेतन अनुदान म्हणून मंजुर तरतुदीतून अदा करण्यास याद्वारे मंजूरी देण्यात येत आहे .

👉👉 राज्य कर्मचाऱ्यांसाठी अखेर निर्गमित झाला महत्वपूर्ण GR ! दि.29.03.2023

सदरचा निधी खर्चासाठी शिक्षण उपसंचालक , मुंबई विभाग , मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य पुर्ण यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे .या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाकडून दि.29.03.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , पदभरती , शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment