राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तदर्थ पदोन्नती म्हणजे काय ? याबाबत निर्गमित झालेला सुधारित राजपत्र / अधिसुचना !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये आधारे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 309 च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन यापुर्वी दि.21 जून 1982 रोजी अधिसूचित केलेली महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली व या संदर्भात तदनंतर निर्गमित केलेले सर्व आदेश किंवा अभिलेख अधिक्रमित करुन महाराष्ट्र राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीमध्ये तदर्थ पदोन्नती बाबत नियम तयार करण्यात आले आहेत .

तदर्थ पदोन्नती याचा अर्थ निवडसूचित अंतिम मान्यता प्राप्त झाल्यावर देण्यात येणारी पदोन्नती .तर तदर्थ निवडसूची याचा अर्थ प्रशासनाची तातडीची गरज म्हणून तदर्थ पदोन्नती देण्यासाठी तयार केलेली निवडसूची , यामध्ये सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदाकरीता अथवा निवड समिती यांच्याकडे मागणीपत्र पाठविल्यानंतरच , मागणीपत्रातील पदसंख्येच्या मर्यादेतील रिक्त पदे भरण्याकरीता अथवा शासकीय कर्मचारी प्रतिनियुक्तीवर गेल्याच्या कारणास्तव एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त राहणारी पदे भरण्याकरीता देण्यात आलेली पदोन्नती म्हणजे तदर्थ पदोन्नती होय .

तुकडी या अर्थ नामनिर्देशनाद्वारे / सरळसेवेद्वारे कोणत्याही पदावर , संवर्गात किंवा सेवेत थेट नियुक्ती करण्यासाठी आयोग अथवा निवड समिती यांनी त्यांच्या कडे पाठविलेल्या मागणीपत्रातील पदसंख्येच्या प्रमाणात उमेदवाराची शिफारसपत्राद्वारे नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे पाठविलेली यादी होय .

तदर्थ पदोन्नतीने नियुक्ती : तदर्थ निवडसूचीद्वारे तदर्थ पदोन्नती दिल्यास , संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास तदर्थ पदोन्नतीच्या पदावरील , संवर्गातील किंवा सेवेतील ज्येष्ठतेचा लाभ मिळण्यास ते पात्र असणार नाहीत . यास्तव सदर शासकीय कर्मचाऱ्यांची या नियमाच्या पोटनियम मधील नियमांनुसार ज्येष्ठता निश्चित केली जाणार नाही व नियम 5 नुसार तयार करण्यात येणाऱ्या ज्येष्ठता यादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश केला जााार नाही . त्यामुळे त्याचे नाव निम्न निम्न संवर्गातील ज्येष्ठतायादीतून वगळले जाणार नाही .

परंतु तदर्थ पदोन्नती ज्या दिनांकास पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदावर नियमित होईल त्या दिनांकास संबंधित शासकीय कर्मचाऱ्याची ज्येष्ठता सदर नियमाच्या पोटनियम नुसार निश्चित केली जाईल व पदोन्नती नियमित झाल्याच्या दिनांकापासून त्याचे नाव नियम 5 नुसार तयार करण्यात येणाऱ्या ज्येष्ठतायादीमध्ये अंतर्भूत केले जातील .

या संदर्भातील दि.21 जून 2021 रोजी निर्गमित झालेला सुधारित सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

सुधारित राजपत्र / अधिसूचना

कर्मचारी विषयक पदभरी / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment