Good News : राज्य कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत अखेर राज्य शासनाकडून शासन राजपत्र निर्गमित !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार , सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत राज्य शासनाच्या असाधारण भाग चार ब नुसार सुधारित वेतनश्रेणीबााबतचा शासन राजपत्र दि.03 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भात निर्गमित झालेली सुधारित अधिसूचना पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियम अधिनियम , 1977 च्या कलम 16 पोट कलम 2 चा आणि पोट कलम 3 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास विनियम अधिनियम समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन , महाराष्ट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियम 1981 यांचा मसुदा त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींचा माहितीकरीता आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत .

या राजपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळांतील कर्मचारी नियम 1981 यांच्या अनुसूची ऐवजी राजपत्रांमध्ये दाखल करण्यात आलेली अधिसूची अधिकृत्त करण्यात आलेली आहे . यामध्ये कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसारच दि.01 जानेवारी 2016 पासून पुर्वलक्षी प्रभावाने सुधारित वेतनस्तर लागु करण्यात आलेले आहेत .

यामध्ये खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गड संवर्ग प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत .या संदर्भातील सविस्तर शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन राजपत्र / अधिसूचना

कर्मचारी विषयक / पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment