राज्य कर्मचाऱ्यांचे संप आणि राज्य शासनाकडून विविध लाभ देवून खूश करण्याचा प्रयत्न ! विमा लाभ शासन निर्णय दि.13.03.2023

Spread the love

राज्य शासकीय -निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आज दि.14 मार्च 2023 पासून संपास सुरुवात होत आहे . अशांमध्येच काही लाभ अनुज्ञेय करुन संप ढिसूळ करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत होता . परंतु राज्य शासनाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत . अशातच राज्यातील दिवंगत वारसांना ठेव संलग्न विमा योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम अदा करणेबाबत शासन परित्रक दि.13 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेा आहे .

सन 2022-23 या वित्तिय वर्षासाठी सामाजिक सुरक्षा व कल्याण , सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम , ठेव संलग्न विमा योजना शासकीय भविष्य निर्वाह निधी संलग्न विमा योजनेनुसार प्रदाने या लेखाशिर्षाखालील मंजुर अनुदानांच्या तरतुदीतून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना एकुण 13,50,000/- इतका निधी सदर ज्ञापनाद्वारे वितरीत करण्यात येत आहे .

या ज्ञापनान्वये उपलब्ध करण्यात आलेला निधी कोणत्याही परिस्थितीमध्ये दि.31.03.2023 पुर्वी खर्च करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .विहीत मुदतीमध्ये निधी खर्च करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकारी यांची असणार आहे .तसेच निधी विहीत मुदतीमध्ये खर्च न झाल्यास सदर निधी समर्पित करुन त्याबाबतचा योग्य तो खुलासा करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची असणार आहे .

सदरचा निधी उपलब्धता प्रमाणपत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयामध्ये नमुद रक्कम अदा करण्याकरीता मंजुरीचे आदेश त्वरीत काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन परिपत्रक

कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment