राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन देणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.27.03.2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील कला संचालनाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये सुधारणा करणेबाबत GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

वरील नमुद तासिका तत्वावरील उमेदवारास एकाच महिन्यात त्याच्या दर्जाच्या अनुज्ञेय वेतनश्रेणीतील सुरुवातीच्या वेतनश्रेणीच्या रकमेपेक्षा अधिक मानधन अदा केले जाणार नाही याची दक्षता संबंधित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संचालक , कला संचालनालय यांनी घ्यावी .तसेच सेवानिवृत्त अध्यापक व संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत व्यवसायातील तज्ञ व्यक्ती यांना तासिका तत्वावरील अध्यापनासाठी निमंत्रित करण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

कला महाविद्यालयाने संचालक कला संचालनालय यांच्या मान्यतेने जाहीरात देवून अध्यापकांची स्थानिक निवड समिती मार्फत निवड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .एका पुर्णवेळ रिक्त पदाकरीता फक्त दोनच तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नेमणूका करता येणार आहेत .एका अध्यापकाकडे जास्तीत जास्त 09 तासिकांचा कार्यभार सोपविता येणार आहे .

सदर सुधारित मानधनाचे दर सदर तासिका कर्मचाऱ्यांना दि.01 एप्रिल 2023 पासून अंमलात येणार आहेत . सुधारित मानधनाबाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दि.27 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment