Breaking News : सरकारी कार्यालयामध्ये उद्यापासून लागणार कर्फ्यू जुनी पेन्शन हा जीवन मरणाचा प्रश्न !

Spread the love

राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना अत्यल्प प्रमाणात पेन्शन मिळत असल्याने , जुनी पेन्शन हा मुद्दा जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे कर्मचाऱ्यांना समजले आहे .यामुळे राज्यातील सुमारे 18 लाख कर्मचारी उद्या दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जात आहेत ,या कालावधीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये कर्फ्यू असणार आहे .

राज्यातील 18 लाख कर्मचारी संपामध्ये सहभाग घेणार असल्याने हा संप नसून महासंप असणार आहे . उद्यापासून राज्यातील 100% शासकीय कार्यालय पूर्णपणे बंद असणार आहे . संपा संदर्भात राज्य शासनाकडून शासन परिपत्रक निर्गमित झालेले असून कठोर कार्यवाहीचे आदेशही देवून देखील , कर्मचारी ठामपणे संपामध्ये सहभाग नोंदवणार आहेत .

सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये अत्यल्प प्रमाणात पेन्शन मिळत आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाचा देखील प्रश्न भागत नाही . यामुळे राज्यातील सर्वच कर्मचारी या संपामध्ये सहभाग नोंदवत आहेत , दुसरीकडे राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये जमा योगदान यावर वजा परतावा मिळत असल्याने कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीत आहेत .

सध्या मार्च एंडिंग सुरू असून ,उद्या पासून कोषागार कार्यालय देखील बंद असणार असल्याने वार्षिक लेखा संदर्भातील अनेक प्रश्न उद्भवणार आहेत . त्याचबरोबर आरोग्य सेवेतील कर्मचारी देखील या संपामध्ये सहभाग नोंदवणार असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे . या संप कालावधीमध्ये केवळ केंद्र सरकारच्या सेवा सुरू असणार आहेत .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment