Employee Strike : संपाची पुढील रूपरेषा संघटनेमार्फत आयोजित ! पाहा सविस्तर !

Spread the love

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने संपाबाबत विविध कार्यक्रम, उपक्रम राबवण्याबाबत संपाची पुढील रूपरेषा आयोजित करण्यात आलेली आहे . यामध्ये दिनांक 20 मार्च 2023 रोजी संपाच्या नियोजित ठिकाणी दुपारी बारा ते 12.30 या वेळेमध्ये गगनभेदी थाळी नाद करून सकारात्मक – नकारात्मक भूमिकाचा धिक्कार करण्यात येणार आहे .

दिनांक 21 मार्च 2023 रोजी सर्व कर्मचारी सकाळी 11 वाजता आपल्या नियोजित ठिकाणापर्यंत पदयात्रा काढणार आहेत , तर दिनांक 22 मार्च 2023 रोजी संपाच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता काळी गुढी उभारून निषेध नोंदवणार आहेत .

तर दिनांक 23 मार्च 2023 रोजी काळे झेंडे शक्यतो काळे कपडे परिधान करून , जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून निदर्शने करणार आहेत . तर दिनांक 24 मार्च 2023 रोजी माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान राबवली जाणार आहे , यामध्ये सकाळी 11 वाजता कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा घेऊन निषेध व्यक्त करणार आहेत .

तर दिनांक 25 मार्च 2023 रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहेत .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .

Leave a Comment