संपामुळे राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकी हप्ता अदा न करण्याचा घेतला मोठा कठोर निर्णय ! परिपत्रक निर्णय !

Spread the love

राज्यातील सुमारे 18 लाख कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दि.14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर कायम आहेत . आज संपाचा चौथा दिवस ठरणार आहे , संपामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अनेक कठोर निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात येत आहेत . या अगोदर संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत .

तर आता कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्यात येवू नये असा कठोर निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे . या संदर्भात राज्य शासनांच्या शिक्षण संचालक ( प्राथमिक ) यांच्याकडून दि.13 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

सन 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये लेखाशिर्षनिहाय 100 टक्के प्राप्त तरतुद वितरीत करण्यात आलेली आहे . यामुळे उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीमधून  सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करण्यात येवू नये असे आदेश  शिक्षण संचालक ( प्राथमिक ) यांच्या कडून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण संचालक , सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद , तसेच राज्यातील सर्व अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना देण्यात आले आहे .

यामुळे माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व उर्वरित हप्ते अदा करण्याचे आदेश यापुर्वी राज्य शासनांकडून देण्यात आलेले होते . परंतु वरील शासन परिपत्रकान्वये सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व उर्वरित पहीला व दुसरा हप्ता लांबणीवर पडला आहे .

कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment