राज्यातील तब्बल 18 लाख कर्मचाऱ्यांचे दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप सुरू आहे , जुन्या पेन्शन या प्रमुख मागणीवर जोपर्यंत अधिकृत निर्णय होत नाही . तोपर्यंत राज्य कर्मचारी संप मागे घेणार नाहीत .अशी स्पष्ट भूमिका कर्मचारी संघटनांकडून घेण्यात आलेली आहे .
परंतु आज राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा महत्वपूर्ण निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने घेण्यात आलेला आहे . राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करून , जुनी पेन्शन योजना प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना मृत्यू योगदान देण्याचा राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना प्रमाणे काही प्रमाणात लाभ देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे .जेणेकरून संपकरी कर्मचारी शांत होतील .
परंतु अद्याप पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला नाही . यामुळे राज्यातील कर्मचारी संपावर ठाम आहेत .जुनी पेन्शन बाबत विधानसभेत विरोधी पक्षाकडून समर्थन देण्यात येत आहे .
राज्याचे मुख्यमंत्री यांनी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचरण करत आहेत . जुनी पेन्शन चा मुद्दा चर्चेने सोडवू संप मागे घ्या , अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे .
कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !