Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आत्ताची मोठी बातमी – एकनाथ शिंदे

Spread the love

राज्य शासन सेवेतील शासकीय / निमशासकीय , अनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणी करिता दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर गेले आहेत . राज्य शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने संप बेमुदत पद्धतीने सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांनी घेतला आहे .

राज्यातील तब्बल 18 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले असल्याने , राज्यातील अत्यावश्यक सेवा देखील बंद आहेत . यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून , जुनी पेन्शनवर चर्चात्मक स्वरूपातून निर्णय घेऊ ! संपामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे , यामुळे चर्चेने मार्ग काढू अशी विनंती राज्य कर्मचाऱ्यांना केली आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री जुनी पेन्शन बाबत सकारात्मक नसून , जुनी पेन्शन लागू केल्यास राज्य शासनावर मोठा आर्थिक भार येईल ! भविष्याच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे स्पष्टीकरण विधिमंडळामध्ये बोलताना स्पष्ट केले आहे . यावरून स्पष्ट होते की राज्य सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यास इच्छुक नाही .

म्हणूनच राज्य कर्मचाऱ्यांना जोपर्यंत जुनी पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याची माहिती राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे .

कर्मचारी विषयक ,भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment