राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिनांक 14 मार्च 2023 पासून सुरू असलेल्या संपाबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अति तात्काळ / अति महत्त्वाचे शासन परिपत्रक दिनांक 17 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेले आहे .
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करणे व अन्य मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 रोजी पासून बेमुदत संप सुरू केला आहे . सदर संपांच्या अनुषंगाने डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल केली आहे . या जनहित याचिकेत दि. 17 मार्च 2023 रोजी सुनावणी घेण्यात आली असून , पुढील सुनावणी दिनांक 23 मार्च 2023 रोजी ठेवण्यात आलेली आहे .
या जनहित याचिकेच्या अनुषंगाने माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांना शनिवारी दिनांक 18 मार्च 2023 रोजी दुपारी एक वाजता त्यांचे मा. उच्च न्यायालय मुंबई येथील दालनामध्ये सदर पुढील प्रमाणे माहिती द्यायची आहे .
यामध्ये दिनांक 14 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 पर्यंत तारखेनिहाय एकूण कर्मचारी किती त्यापैकी किती कर्मचारी संपात सहभागी झालेली आहेत , किती कर्मचारी पूर्व परवानगिने रजेवर आहेत , किती कर्मचारी कार्यालयात उपस्थित आहेत , त्याचबरोबर सदर कर्मचारी संपावर गेल्यामुळे कोणकोणत्या सेवावर त्यांचा दुष्परिणाम झालेला आहे ?
सदर कर्मचारी संपावर गेल्यामुळे कार्यालयात काय – काय अडचणी आलेले आहेत. तसेच सदर कर्मचारी संपावर गेल्यामुळे त्यावर पर्यायी व्यवस्था अथवा उपाययोजना काय करण्यात आली किंवा कसे ? त्याचबरोबर सदर कर्मचारी भविष्यात संपावर गेले तर त्यावर काय उपाययोजना करण्यात येणार आहे . तसेच संप कालावधीत कोणकोणत्या सेवा देण्यात येत आहे किंवा कसे ? या संदर्भातील माहिती राज्याचे महाधिवक्ता यांना देण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक , सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत .

कर्मचारी विषयक ,भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !