राज्य शासन सेवेतील कर्मचारी दिनांक 14 मार्च पासून बेमुदत संपावर आहेत , दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होत असताना आपल्याला दिसून येत आहे . कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे , यामुळे राज्य शासनाच्या मंत्रालयीन स्तरावर तातडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे .
राज्य शासन सेवेतील राजपत्रित अधिकारी दिनांक 28 मार्च 2023 पासून , राज्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याने , राज्य शासनाकडून तातडीची बैठक दिनांक 20 मार्च 2023 वार सोमवार रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे . सदर बैठकीमध्ये जुनी पेन्शन संदर्भात चर्चा करून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्याच्या विनंती राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे .यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,राज्याचे मुख्य सचिव व राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत .
सध्या प्रशासकीय व्यवस्था 60% बंद असून राज्यातील कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांसह राजपत्रित अधिकारी प्रशासन चालवित आहेत . जर राजपत्रित अधिकारीच संपावर गेल्यास संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था बंद होईल , परिणामी नागरिकांचा सरकार वरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल .
राज्य शासनाकडून जोपर्यंत जुनी पेन्शन लागू करण्यात येणार नाही, तोपर्यंत संप चालूच असणार आहे .यामुळे राज्याचे मंत्रालयीन स्तरावर ,अद्याप जुनी पेन्शन बाबत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही केवळ अभ्यास समितीच नेमण्यात आलेली आहे .आज रोजी आयोजित बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .
कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !