Strike : राज्य कर्मचाऱ्यांचे संपाबाबत नेमकी काय होणार जाणून घ्या , मोठी अपडेट !

Spread the love

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे संपाबाबत नेमके काय होणार , असा प्रश्न सर्वांना पडला आहे . 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्यास , राज्य शासनावर मोठा आर्थिक भार येईल . यामुळे राज्य शासन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास तूर्तास सहमत नाही .

असे असले तरी राज्य शासन सेवेतील तब्बल 18 लाख कर्मचारी संपावर आहेत . यामुळे सध्या संपूर्ण प्रशासन व्यवस्था बंद झालेली आहे . यामध्ये आणखीन भर म्हणून , दिनांक 28 मार्चपासून राज्यातील राजपत्रित अधिकारी संपामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांचे पारडे आणखीन जड होणार आहे .

दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होत असताना , दिसून येत आहे . यातच शेतकऱ्यांचा देखील भव्य मोर्चा निघत आहे , यामुळे शिंदे फडणीस सरकारची झोप उडाली आहे , विरोधी पक्षनेते कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे बाबत , तूर्तास भाष्य करत नसून राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नाना पटोले कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत आहेत . त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर विधान परिषदेचे शिक्षक आमदार , व पदवीधर मतदारसंघाचे आमदार राज्य कर्मचाऱ्यांना सक्रिय पाठिंबा देत आहेत .

त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे देखील कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .

कर्मचारी विषयक , शासकीय भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment