संपामध्ये सहभागी झाल्यास वेतन कपातीसह कर्मचाऱ्यावर होणार या प्रकारच्या कडक कार्यवाही ! शासन निर्णय निर्गमित, GR दि. 13 मार्च 2023

Spread the love

दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन संदर्भात करावयाची कारवाई संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 13 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे .संपा संदर्भातील निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूया ..

बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन संदर्भात शासनास नोटीस दिलेली आहे .

बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या दिनांक 14 मार्च 2023 पासूनच्या बेमुदत संप आंदोलना दिवशी शासकीय /निमशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालय विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांना पुढे दर्शविल्याप्रमाणे उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत .

शासकीय – निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचारी विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश विना विलंब निर्गमित करण्यात यावेत व ते सर्व कर्मचारी यांच्या व्यक्तिशः निदर्शनास आणावेत . त्याचबरोबर त्या आदेशाची प्रत शासनाच्या प्रत्येक विभाग / कार्यालय यांच्या सूचना फलकावर लावण्यात यावे . असे निर्देश सदर शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेली आहेत .

त्याचबरोबर कर्मचारी संपात सहभागी न होता नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न कारणे प्रमुखांनी करावे असे सूचना देण्यात आलेली आहेत .

तसेच संप काळात कार्यालय नेहमी प्रमाणे वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करण्यात यावी व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांच्याकडे देण्यात यावी .आवश्यकता असल्यास गृहरक्षक किंवा पोलीस दलाची मदत घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर संप कालावधीमध्ये विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये अशा सूचना देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर विभाग प्रमुखांनी त्याचबरोबर कार्यालय प्रमुखांनी या आदेशाच्या दिनांकापासून संप संपेपर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारच्या रजा मंजूर करू नये . आणि जे कर्मचारी रजेवर असतील अशा प्रत्येक प्रकरणी विचार करून त्यांची रजा रद्द करून त्यांना कामावर तात्काळ बोलवावे किंवा कसे ते ठरवावे .

त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाच्या ‘काम नाही वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुकरण असल्याचे कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेली आहेत . तसेच संपामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये खंड पडू शकतो याची सर्व संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात यावे असे निर्देश सदर शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 13 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

शासन परिपत्रक

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment