राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / सेवानिवृत्ती इतर लाभ , नागरी , अनुकंप भत्ता लाभ संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.10.03.2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेले महाविद्यालय व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित औषधात निवृत्तीवेतन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरण करणे बाबत , राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 10 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे .

राज्यातील कृषी विद्यापीठ व कृषी विद्यापीठाची संलग्न असलेल्या सर्व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सदस्य असणारा कर्मचारी दहा वर्ष सेवा होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू पावल्यास नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशीर वारसदारास दहा लाख रुपये इतके सहानुग्रह अनुदान देण्याबाबत , वित्त विभागाच्या दिनांक 28. 2 .2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार , सदर कर्मचाऱ्यास सानुग्रह अनुदानाची रक्कम आहारित करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष वित्त विभागाच्या मान्यतेने मंजुरी देण्यात येत आहे .

यानुसार सन 2022- 23 करिता राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत सानुग्रह अनुदान यासाठी आठ कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत असून त्यापैकी तीन कोटी दहा लाख रुपये इतके अनुदान वितरित करण्यास सदर शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे.

सदरचा नीधी निवृत्ती वेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ, नागरी , अनुकंप भत्ते या लेखाशीच्या खाली खर्ची टाकण्याचे आदेश सदस्य शासन निर्णयाने देण्यात आलेला आहे .या संदर्भातील दि.10.03.2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय (GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment