राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.03.03.2023

Spread the love

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात E-HRMS प्रणाली विकसित करण्यात आली असून या संदर्भात सामान्‍य प्रशासन विभागाकडून दि.03 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यानुसार आता सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहेत .

सदर निर्णयांमध्ये सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते कि , नव्याने होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची सेवा पुस्तके E-HRMS प्रणालीमध्येच भरण्यात येतील याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .काही अपरिहार्य कारणामुळे ज्या नवनियुक्त अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तके e-HRMS मध्ये भरणे शक्य झालेले नाही / होणार नाही त्यांची सेवा पुस्तके त्यांच्या सेवा नियमित करताना कोणत्याही परिस्थितीत E-HRMS प्रणालीमध्ये भरण्यात यावे असा आदेश देण्यात आलेले आहे .

तसेच अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तके स्कॅनिंग करुन e-HRMS प्रणालीवर अपलोड करण्याची कार्यवाही दि.31.03.2023 पुर्वी पुर्ण करण्यात येईल याची सर्व विभाग व कार्यालयांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तके यापुढे E-HRMS प्रणालीवरच उपलब्ध होतील याची सर्व विभागांनी दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

E-HRMS प्रणालीमध्ये सेवापुस्तकविषयक आवश्यक माहिती नियमित भरल्यामुळे सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवा पुस्तके वेळोवेळी अद्यावत राहण्यास मदत होईल .तसेच जे अधिकारी / कर्मचारी रजेवर आहेत त्यांचा अहवाल उपलब्ध होईल .वर्षांतुन दोनदा अधिकारी व कर्मचारी यांच्या खात्यात रजा आपोआप जमा होतील .तसेच 50/55 वर्षातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवांचे पुनर्विलोकन करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची यादी उपलब्ध होतील .

तसेच ज्या अधिकारी / कर्मचारी यांना प्रमाणपत्र प्राप्त नाही त्यांची यादी उपलब्ध होईल .तसेच ज्या अधिकारी / कर्मचारी यांची विभागीय चौकशी सुरु आहे त्यांची यादी सहज उपलब्ध होईल .तसेच जे अधिकारी / कर्मचारी नियत वयोमानानुसार , सेवानिवृत्त होणार आहेत त्यांची 6 महिने अगोदर यादी उपलब्ध होईल .या संदर्भातील सा.प्र.विभागांकडून दि.03 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment