राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजना नंतर सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे . सध्या राज्य शासन सेवेतील वर्ग क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे असून संवर्ग ड मधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे .
केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहेत .याच धर्तीवर राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून साठ वर्ष करण्यात यावे अशी मागणी राज्यातील विविध कर्मचारी संघटना कडून राज्य शासनाला वेळोवेळी निवेदने दिलेले आहेत .सदर निवेदनावर राज्याच्या सामान प्रशासन विभागाकडून प्रस्ताव देखील तयार करण्यात आलेला होता , परंतु या प्रस्तावाला राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी विरोध केल्याने सदर प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबितच आहे .
परंतु सध्या शिंदे सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवली जात आहेत . प्रलंबित प्रश्नापैकी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असल्याने राज्य शासनाकडून या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
जेणेकरून राज्यातील कर्मचाऱ्यांना दोन वर्षाचे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे शिवाय शासन सेवेत वयाने उशिरा रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे .
कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !