जुनी पेन्शन नंतर केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन नंतर दुसरी सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे  करणे . राज्य कर्मचाऱ्यांनी संपाच्या मागणी पत्रकांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी देखिल करण्यात आलेली होती .यावर मागणीवर राज्य सरकारकडून विशेष दखल घेवून निर्णय घेतला जाणार आहे .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची गरज –

सध्या राज्य शासन सेवेमधील संवर्ग ड कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे तर संवर्ग क , ब आणि अ संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे .काही कर्मचारी हे सेवेमध्ये उशिराने रुजू झाले आहेत , अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यास दोन वर्षांची अतिरिक्त सेवा मिळेल .शिवाय राज्य शासन सेवेमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा देखिल फायदा होईल .

आजकाल खाजगी कंपनी मध्ये 65 वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले जाते , विशेष म्हणजे खाजगी कंपनी मध्ये शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना खाजगी कंपनी मध्ये विशेष जागा ठेवले जात आहे . जेणेकरुन शासकीय कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा मोठा होत असतो .

हे पण वाचा : सरकारकडून नवीन पेन्शन प्रणाली तयार !

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबतच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याकरीता राज्य सरकारकडून विशेष समिती गठीत करण्या येणार आहे . संपाच्या वेळी सादर करण्यात आलेल्या इतर 17 मागणीवर देखिल सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिलेला आहे .यामुळे सेवानिवृत्तीसह इतर मागणींवर देखिल सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे .

कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment