महाराष्ट्र शासन सेवेतील राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपुर या महामंडळाच्या सेवेत दि.01.04.2008 पासून कार्यरत असलेल्या 52 कर्मचाऱ्यांना दि.01.01.1996 ते दि.31.03.2008 या कालावधीच्या थकबाकी एवढी रक्कम अनुदान स्वरुपात अदा करण्याबाबत सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य हातमाग मर्यादित नागपूर येथील सेवानिवृत्त / स्वेच्छानिवृत्त 371 कर्मचाऱ्यांना दि.01.01.1996 ते 31.03.2008 या कालावधीतील 5 व्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी खास बाब म्हणून ज्याप्रमाणे सानुग्रह अनुदान स्वरुपात अदा केली त्याप्रमाणे हातमाग महामंडळातील कार्यरत 52 कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकी रुपये 1,60,78,223/- रुपये इतकी रक्कम सानुग्रह अनुदान स्वरुपात अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपुर येथील कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी अनुदान अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी रुपये 1,60,78,223/- इतकी तरतुद करण्यात आलेली आहे .
सदर शसन निर्णय विधी व न्याय विभाग आणि नियोजन विभागाशी विचारविनियम करुन तसेच वित्त विभागाचे दि.03.02.2023 रोजी दिलेल्या सहमतीने व दि.02.03.2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे . या संदर्भातील सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून दि.10.03.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !