राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत आज रोजी निर्गमित झालेला महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कला संचालनायाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनाचे दर सुधारित करण्याबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले असून , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयाकडून शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्वावरील तसेच अभ्यागत अध्यापकांना अदा करावयाच्या मानधनाचे दर संदर्भिय शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत . सदर शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेले मानधनाचे दर सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .याबाबत सर्वांगिन विचार करुन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .

सुधारित वेतनाबाबतचा शासन निर्णय पाहा

कला संचालनाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांकडून शिकविण्यात येणाऱ्या पदवी / पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी तज्ञ अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या पुढीलप्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे .

तासिका तत्वावरील अध्यापक / तज्ञ अभ्यागत यांना निमंत्रित करण्यापुर्वी संस्थेतील संबंधित विद्याशाखेतील सर्व शिक्षकीय तसेच प्रशासकीय पदावर काम करीत असलेल्या शिक्षकांना प्रमाणकानुसार शैक्षणिक भार देण्यात आला आहे . यांची खात्री महाविद्यालयाचे अधिष्ठाता / प्राचार्य यांनी करुन घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात सुधारित मानधन वाढीबाबतचा दि.27.03.2023 रोजीचा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !

सुधारित वेतन बाबतचा शासन निर्णय

कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment