Breaking News : संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी धक्कादायक बातमी !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचा दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप सुरू झालेला असून ,या संपामध्ये राज्यातील शासकीय निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे . यामुळे राज्य शासनाची संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झालेली आहे .

परंतु संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे जे कर्मचारी कामावर हजर होऊ इच्छिता परंतु अशा कर्मचाऱ्यांवर कर्मचारी संघटनांकडून किंवा इतर कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकून इच्छा नसताना संपामध्ये सहभागी करून घेणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केली आहे .

त्याचबरोबर उच्च न्यायालयामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे .या याचिकेवर पहिली सुनावणी झालेली असून , दुसरी सुनावणी दिनांक 23 मार्च 2023 रोजी होणार आहे . याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झालेले आहेत . त्या परिणामास राज्यातील कर्मचारी जबाबदार आहेत यामुळे कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी या याचिकेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे .

कर्मचारी विषयक ,भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment