राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात येणार ! बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय !

Spread the love

आज दि .20 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यासमवेत दुपारी 2:00 वाजता बैठक संपन्न झाली असून , या बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे संदर्भात , सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे संदर्भात कार्यकारणी अहवाल उद्या विधिमंडळामध्ये मांडण्यात येणार आहे . या संदर्भात कार्यकारणी अहवाल उद्या विधिमंडळामध्ये सादर करण्याची जबाबदारी राज्याचे मुख्य सचिव यांना देण्यात आलेली आहे . शासन कार्यकारणी अहवाल सादर केल्यानंतरच कर्मचारी संप मागे घेण्याबाबतचा विचार करतील अशी माहिती कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .

कार्यकारणी अहवालानुसार आंदोलन सुरू ठेवणे किंवा बंद करणे बाबतचा निर्णय कर्मचारी संघटनाकडून घेण्यात येईल , सदर शासन कार्यकारणी अहवालामध्ये , जुनी संदर्भात सकारात्मक निर्णय असल्यास संप तात्काळ मागे घेण्यात येणार ,असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली .

यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपाला कुठेतरी यश येत असल्याचे दिसून येत आहे . उद्याच्या कार्यकारणी अहवालानुसारच जुनी पेन्शन कशा पद्धतीने लागू करण्यात येईल याबाबत नमूद करण्यात येईल .

कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment