मोठी बातमी : संपाच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात , वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.14.03.2023

Spread the love

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पेन्शन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.14 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . पेन्शन संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासनाच्या सेवेमध्ये दि.05.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु करण्यात आली आहे . राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . सदर शासन निर्णयानुसार , खालीलप्रमाणे समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .

या समितीमध्ये श्री.सुबोध कुमार (भा.प्र.से सेवानिवृत्त ) , श्री.के.पी.बक्षी ( भा.प्र.से सेवानिवृत्त ) , श्री.सुधाीरकुमार श्रीवास्तव ( भा.प्र.से सेवानिवृत्त ) , समितीचे सचिव – संचालक लेखा व कोषागारे अशा चार जनांची समितीची गठीत करण्यात आलेली आहे .

सदरच्या समितीने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दि.1.11.2005 किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्या करीता उपाययोजना बाबतची शिफारस / अहवाल शासनास 3 महीन्यांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे .

या संदर्भातील वित्त विभागाकडून दि.14 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment