जुनी पेन्शन योजना संदर्भात तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महासंघाकडून शासनाने गठीत केलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या समिती समोर महासंघाच्या वतीने वस्तुनिष्ठ आकडेवारीसह भूमिका मांडून अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करायचा आहे .
त्याकरिता सर्वांना महासंघाकडून सुचित करण्यात आली आहे की, जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून तार्किक व आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मते विचार मांडू शकणाऱ्या खाते संघटना तसेच जिल्हा समन्वय समितीमधील अभ्यासू सहकाऱ्यांची नावे निश्चित करून संपर्क ,ईमेल ,आधीसह अशा प्रतिनिधींचा तपशील संघटनेच्या अधिकृतपत्राद्वारे महासंघाच्या ईमेलवर दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत सादर करण्याचे आव्हान करण्यात आली आहे . यामध्ये नवीन पेन्शनधारक सहकाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा अशी अपेक्षा यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे .
जुन्या नव्या पेन्शन योजने संदर्भात वस्तुनिष्ठ चर्चा विनिमय करण्यासाठी सदर अभ्यासूच प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता अधिकारी महासंघाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे . बैठकीला येताना उपस्थित पेन्शन योजने संदर्भातील मुद्दे लिखित स्वरूपात द्विप्रतीत सोबत आणण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे .
यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक खालील प्रमाणे आहे

कर्मचारी विषयक भरती योजना व राज्य अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !