राज्य कर्मचाऱ्यांचे संप सोमवार पासून घेणार वेगळे वळण ! जाणून घ्या अपडेट !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांचा आज दि.18 मार्च 2023 रोजी संपाचा पाचवा दिवस आहे .तरी देखील राज्य शासनाने जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नसल्याने , आता कर्मचाऱ्यांचे संप सोमवार पासून वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे . यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..

सोमवारी दि.20 मार्च पासून संप वेगळ्याच वळणावर जाण्याची शक्यता आहे .कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी याबाबत संवाद साधला असता , त्यांनी सांगितले की सोमवार पासून संपाची तीव्रता अधिकच वाढणार असून , सध्या काही प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा सुरू होती .ते देखील सोमवार पासून बंद करण्यात येणार आहेत .अशी माहिती देण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर काही शाळा अजूनही सुरू होत्या त्या शाळा सोमवार पासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .त्याचबरोबर दि.28 मार्चपासून राज्यपत्रित अधिकारी देखील संपामध्ये सहभागी होणार असल्याने , दि.28 मार्च 2023 पर्यंत संपाचे आयोजन राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना , महाराष्ट्र या संघटनेमार्फत नेतृत्व करण्यात येणार आहे .

तर राज्यपत्रित अधिकारी सामील झाल्यास , कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघ देखील खांद्याला खांदा लावून जुनी पेन्शन संपामध्ये सहभाग घेणार आहेत .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment