राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 42% DA वाढीबाबत ,वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार!

Spread the love

राज्यातील शासकीय, निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4% टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे , यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची बातमी मीडिया रिपोर्ट नुसार समोर येत आहे .

जानेवारी 2023 पासून वाढीव 4% DA

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के दराप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे , सदरचा वाढीव महागाई भत्ता माहे मार्च महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करणेबाबत अधिकृत निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे .

केंद्र सरकार प्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासूनच वाढीव 4% टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे . मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत डीए वाढीसह जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यातील डीए फरकासह वाढीव डीए लागू करण्याबाबत , वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल !

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान राज्य सरकारने त्वरित दुसऱ्याच दिवशी राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . यामुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत 4% वाढीव DA बाबतचा अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल .

हे पण वाचाआता फक्त 70 वर्षापर्यंतच मिळणार पेन्शन

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment