Dearness Allowance : शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने दिला मोठा धक्का! महागाई भत्ता बाबत शासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय !

Spread the love

सर्व शासकीय कर्मचारी आपल्याला मिळणाऱ्या महागाई भत्त्याची वाट ही वर्षांमधून दोनदा नेहमी बघतच असतात. आता हा जो काही महागाई भत्ता आहे. तो कर्मचारी यांच्या बेसिक मध्ये जोडला जात असतो. त्यामुळेच बाकीचे जे काही अलाऊंस आहे ते टक्केवारीच्या आधारावर मिळत असते.

सर्व शासकीय कर्मचारी हे जानेवारी महिन्यात मिळणाऱ्या महागाई भत्त्याची वाट बघत होते. अशावेळी होळीच्या अगोदरच सरकार महागाई भत्त्याची जी काही घोषणा असेल ती करेल अशी बातमी सर्वांच्या कानावर पडत होती. परंतु अजूनही याबाबतची कोणतीही घोषणा शासनाने केली नसून आता सर्व शासकीय कर्मचारी त्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची वाट पाहत आहे…

उद्या होणार आहे कॅबिनेट मध्ये बैठक त्या ठिकाणी महागाई भत्त्याचा मुद्दा हा चर्चेचा विषय बनू शकतो. यासोबतच केंद्रीय कर्मचारी सुद्धा उद्या उत्साही असणार आहेत कारण की त्यांना लवकरच खुशखबर मिळू शकते. असा अंदाज तज्ञ लोकांनी वर्तविला आहे. याबाबत आता कोणतेही माहिती अधिकृत जाहिरातीवर प्रकाशित झालेली नाही. तरीही याबाबतची माहिती चर्चेत आहे…

दुसऱ्या ठिकाणी बघितले तर शासनाने सर्वांसमोर हेच स्पष्ट केले आहे की, कोरोना कालखंडामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना रोखण्यात आलेला 18 महिन्याचा महागाईचा भत्ता याशिवाय नागरिकांना दिले जाणारा डीए हा दिला जाणार नाही. लोकसभे अंतर्गत होणाऱ्या प्रश्नोत्तरांमध्ये शासनाने ही माहिती दिली आहे शासनाने त्यावेळी असे देखील सांगितले आहे की या शासनाच्या निर्णयामुळे सरकारचे 34 हजार 402 कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे ते पैसे कोरोना कालखंडामध्ये उपाययोजनांसाठी वापरण्यात आली आहेत याबाबतची माहिती सांगितली आहे.

शासनाच्या माध्यमातून आता अशी सुद्धा सांगण्यात आले आहे की, सध्या अर्थसंकल्पनेमध्ये जी काही तूट दिसून येत आहे. ते दुप्पट असून डीए देण्याबाबत यावर कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही शासकीय कर्मचाऱ्यांना आता हा नवीन मोठा झटका दिलेला आहे. तरीसुद्धा उद्या जी बैठक होणार आहे त्या ठिकाणी डीए च्या मुद्द्यावर नक्कीच चर्चा होईल याबाबत माहिती पहावी लागेल…

Leave a Comment