खुशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई 4 % वाढ ! अधिवेशनात मोठा निर्णय !

Spread the love

राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषदा , शासकीय /निमशासकीय त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ होणार आहे . सदरची वाढ केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2023 पासून करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे .

सध्या राज्य शासनाचे अधिवेशन सुरू आहे , या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नांवर चर्चा होत आहे ,आज दिनांक 3 मार्च 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात विचारणा केली असता , तूर्तास राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत असल्याने , सदरची नाराजी दूर करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ करण्यात येणार आहे .

सध्या राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे .यामध्ये जानेवारी 2023 पासून चार टक्के वाढ करण्यात येणार असल्याने , एकूण महागाई भत्ता 42% वर जाऊन पोहोचणार आहे . ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये त्याचबरोबर पेन्शन धारक कर्मचाऱ्यांचे पेन्शन मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे .

वाढीव DA संदर्भातील निर्णय लवकरच अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतन त्याचबरोबर पेन्शन सोबत वाढीव चार टक्के डीए प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .

कर्मचारी विषयक, भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment