Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट ! पत्रक निर्गमित !

Spread the love

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीला महासंघाच्या वतीने द्यावयाचा प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक दिनांक 31 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली असून , राज्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर जिल्हा समन्वय समिती व कार्यालय प्रतिनिधी यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत महासंघाकडून सूचित करण्यात आलेले आहे .

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुद संपाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 9 मार्च 2023 रोजी महासंघाला सहभागासाठी आव्हान करण्यात आले होते . त्यास अनुसरून महासंघाने देखील तातडीने कार्यकारणी बैठक दिनांक 13 मार्च 2023 रोजी घेऊन , त्याच दिवशी राज्य शासनास 15 दिवस अवधीचा संपाची नोटीस देऊन , दिनांक 28 मार्च 2023 पासून बेमुद संपामध्ये , सक्रिय सहभागाचे निर्णय घेतला होता .

महासंघाच्या नियोजित आंदोलनाच्या शासन स्तरावर गंभीर दखल घेऊन , आंदोलन संदर्भात आंदोलन संघटनाच्या शासन प्रशासनाची झालेल्या बैठकामध्ये , जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांना मिळणार आता फक्त 70 वर्षांपर्यंतच पेन्शन !

जुन्या पेन्शन योजने संदर्भात राज्य शासनाने दिनांक 14 मार्च 2023 रोजी समिती गठित केलेली असून , सदर समिती समोर अधिकारी / कर्मचारी संघटनांनी आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडावी असे आव्हान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे . सदर समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून घेण्याचे आश्वासित करतानाच त्या संदर्भात , जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षेतेची हमी देण्याचे धोरण तत्व म्हणून राज्यशासन मान्य करीत असल्याचे लिखित स्वरूपात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देण्यात आले आहेत .

माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आव्हानास अनुसरून कर्मचारी संघटना व समन्वय समितीने बेमुदत संप आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे , त्यास अनुसरूनच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने देखील दिनांक 28 मार्च 2023 पासून सदर बेमुदत संप आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय स्थगित केला आहे .

बैठकीचे आयोजन संदर्भात महासंघांकडून सविस्तर परिपत्रक निर्गमित झालेले असून परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

सविस्तर पत्रक पाहा

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment