राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित ! दि.28 मार्च 2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार , कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग ठरविण्याबाबत महाराष्ट शासनाकडून दि.24 मार्च 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर राजपत्र पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियम नुसार , कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार प्रवर्ग निश्चित करण्यात आलेले आहे .यामध्ये प्रवर्ग क मध्ये पदव्युत्तर पदवी ,पदवी ,पदविका धारण करणारे कर्मचारी तसेच क्रिडा शिक्षकांसाठी 250 विद्यार्थ्यांसाठी एक शारिरीक शिक्षक व शारिरीक शिक्षण या विषयाचा किमान 50 टक्के कार्यभार या अटींची पूर्तता होत असलेल्या प्रकरणी ! असी पात्रता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश प्रवर्ग क मध्ये करण्यात येते .

प्रवर्ग क ,ड , ई यामध्ये समावेश होण्यासाठी नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने त्या त्या प्रवर्गाकरीता प्रकरणपरत्वे प्रशिक्षित शिक्षकास आवश्यक असलेली अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहे , त्या प्रवर्गातील त्याची ज्येष्ठता संबंधित प्रवर्गात समाविष्ट झाल्याच्या तारखेपासून विचारात घेण्यात येणार आहे .

तसेच पगर्व फ , ग किंवा ह मध्ये समाविष्ट असलेल्या एखाद्या शिक्षकाने सेवेत असताना प्रकरणपरत्वे प्रवर्ग क , ड किंवा ई प्रवर्गात अंतर्भत असलेल्या प्रशिक्षित शिक्षकांसाठीची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केल्यास , संबंधित शिक्षकांचा समावेश त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केल्यास संबंधित शिक्षकाचा समावेश त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार प्रशिक्षित शिक्षकांसाठी असलेल्या संबंधित प्रवर्गात करण्यात येणार आहे .

एखाद्या प्राथमिक गटातील शिक्षकाने उच्‍च शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केली असेल तथापी माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक गटासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली नसल्यास ,अशा प्रकरणी संबंधित शिक्षक , माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक सेवाज्येष्ठतेच्या सूची मध्ये ज्येष्ठतेचा दावा करु शकणार नाही .त्याच्या उच्च शैक्षणिक पात्रतेस केवळ अतिरिक्त पात्रता मानले जाणार आहेत .

या संदर्भातील दि.24.03.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन राजपत्र डाऊलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन राजपत्र

कर्मचारी विषयक , पदभरती , शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment