राज्य कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी ! घरभाडे भत्ता बाबत अखेर राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासून घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे . यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता मध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली होती . सदर निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी ऑक्टोबर 2021 पासून करण्यात आलेली आहे .

यामुळे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीमधील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना यापूर्वीच वेतन देयकासोबत अदा करण्यात आलेली आहे . ऑक्टोबर 2021 पासून सुधारित दराने घरभाडे भत्ता फ़रक केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाच अदा करण्यात आले आहे .

मात्र राज्यातील अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीमधील घरबाडे भत्ता फरकाची रक्कम अद्याप पर्यंत अदा करण्यात आलेली नव्हती . कारण शालार्थ प्रणालीमध्ये सदर फरक काढण्याचा टॅब उपलब्ध नसल्याने सदरचे देयके , अद्याप पर्यंत प्रलंबितच होते .

मात्र शिक्षकांच्या तक्रारीनंतर मुंबई मराठा अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरणारे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना सदरची चूक लक्षात आणून दिली , असता राज्य शासनाकडून संबंधित शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना घरबाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे सूचना संबंधित विभागांना देण्यात आलेली आहे .

यामुळे राज्यातील अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षण तर कर्मचाऱ्यांना गरबाडे भत्ता फरकाची रक्कम लवकरच मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

कर्मचारी विषयक शासकीय भरती शासकीय योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment