State Employee : अखेर राज्य कर्मचारी हितासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल जाणून घ्या आत्ताचे महत्त्वपूर्ण अपडेट

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात येत्या 14 फेब्रुवारी 2023 पासून राज्य कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे .या संपामध्ये राज्यातील सुमारे 17 लाख शासकीय / निमशासकीय कर्मचारी सहभाग घेणार आहेत . यामुळे राज्य शासनाकडून कर्मचारी हिताचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहेत . या संदर्भातील आत्ताची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..

माहे डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते . त्याचबरोबर विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी देखील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे धाडस फक्त भारतीय जनता पार्टी मध्येच आहे असे सांगितले होते .

परंतु अद्याप पर्यंत राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आलेली नाही , यामुळे राज्य कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर जात आहेत .

परंतु भारतीय जनता पार्टीची सत्ता असणारे कर्नाटक राज्यामध्ये जुनी पेन्शन जुनी पेन्शन लागू करणेबाबत , समिती गठीत करण्यात आली आहे . व लवकरच कर्नाटक राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात येईल असे आश्वासन कर्नाटक राज्य सरकारने दिली आहे . यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन लागू करण्यात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे .

कर्नाटक राज्यातील भारतीय जनता पार्टीने जुनी पेन्शन बाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याने , महाराष्ट्र राज्य सरकार देखील जुनी पेन्शन बाबत योग्य तो सकारात्मक पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

कर्मचारी विषयक , शासकीय भरती व शासकीय योजना , ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment