राज्य कर्मचाऱ्यांना DA फरकासह वाढीव 4% DA लागू करण्यास वित्त विभागाची मंजुरी !

Spread the love

राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषदा , शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी , निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच राज्य शासन सेनेतील सेवानिवृत्त पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना डीए फरकासह वाढीव चार टक्के मागे भत्ता लागू करण्यास अखेर वित्त विभागाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे .

सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे , सदर अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा होत असून माहे जानेवारी 2023 पासून राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या अहवालानुसार 4% डीए वाढवण्यास मंजुरी दिली आहे .

या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या आधारे राज्य शासन सेवेतील शासकीय /निमशासकीय व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के महागाई भत्ता जानेवारी 2023 पासून लाग लागू करण्यास वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत असून सदर प्रस्तावाला वित्त विभाग कडून मंजुरी दिली असल्याची वृत्त समोर येत आहे .

यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के महागाई भत्तामुळे माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के दराने डीए लाभ मिळणार आहे .सदर वाढीव चार टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च पेड इन एप्रिलच्या वेतन / पेन्शन देयकासोबत सोबत रोखीने अदा करण्यात येईल .

कर्मचारी विषयक /शासकीय भरती ,योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment