राजस्थान , छत्तीसगड , हिमाचल प्रदेश, उडीसा ,छत्तीसगड अशा महाराष्ट्रापेक्षा कमी प्रगत असणाऱ्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे . तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू का होत नाही असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे . राज्य कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता कोल्हापूर येथे शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून महामोर्चा काढण्यात आला .
हा महामोर्चा कोल्हापूर मध्ये गांधी मैदान ते कलेक्टर कार्यालय असा काढण्यात आला , या मोर्चाला काँग्रेसचे नेते आमदार श्री. सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी त्यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता येत्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात यावी अशी प्रमुख मागणी राज्य सरकारकडे केली .
राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून 1982 ची जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी . अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनामध्ये करण्यात आली , जर राज्य शासनाकडून जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या 14 मार्च 2023 पासून राज्य कर्मचारी काम बंद आंदोलन करतील असा इशारा दिला आहे .
कोल्हापूर येथे झालेल्या महामोर्चाला राज्यातील अनेक कर्मचारी उपस्थित होते . या मोर्चाला सुमारे 50,000 राज्य शासकीय , निमशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला . या पेक्षाही तीव्र आंदोलन येत्या दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत . यामुळे राज्य शासनाला आता तात्काळ जुनी पेन्शन योग्य तो निर्णय घेणे भाग पडणार आहे .
कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !