Solar Rooftop Yojana : वीज बिलाचे टेन्शन संपले ! घरावर सोलर पॅनल बसवण्याकरिता शासन देत आहे इतके अनुदान ! अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज !

Spread the love

Solar Rooftop Yojana : नागरिकांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करावा आणि विज बिलाच्या व अपुऱ्या पडणाऱ्या विजेच्या समस्येपासून वाचण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. आता अलीकडे पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत पात्र बंधू-भगिनींना अनुदानाच्या माध्यमातून सोलर पंप उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर घरगुती विजेच्या वापरासाठी सोलर पॅनल बसवण्याकरिता सुद्धा शासन नागरिकांना अनुदान उपलब्ध करून देत आहे…

वीज ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये सौर ऊर्जेची वीज उपलब्ध करून देण्याकरिता सोलर रूप टॉप योजना राबवण्यात येत आहे. शासनाने राबवलेली ही योजना थेट केंद्र शासन राबवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध महत्वकांक्षी योजनेपैकी ही एक महत्त्वाची योजना असल्याचा दावा तज्ञ लोक करत आहेत.

योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक लोकांनी आतापर्यंत आपल्या घरावर सोलर पॅनल बसवून विजेच्या समस्येवर चांगला मार्ग शोधला आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण योजनेचे स्वरूप काय असेल, योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज कशा प्रकारे करावा व कोठे करावा याविषयी तपशीलवार माहिती आज आपण पाहणार आहोत…

योजनेचे स्वरुप नेमके काय?

सोलर रूफ टॉप योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याकरिता शासन सर्वच नागरिकांना 40% अनुदान उपलब्ध करून देत आहे. दरम्यानच आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दहा किलो वॅट पर्यंत जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचे असेल तर पहिल्यांदा तीन किलोमीटर पर्यंत 40% पर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय सात किलो वॅट सोलर पॅनल बसवण्याकरिता आपल्याला 20% पर्यंत अनुदान शासन देत आहे…

दहा किलोमीटर पेक्षा अधिक जर सोलर पॅनल तुम्हाला बसवायचे असेल तर अशावेळी अनुदानाचे प्रावधान मान्य केले जाणार नाही. मात्र असा विषय असला तरी सुद्धा ग्रहनिर्माण संस्था या सोबतच घरगुती ज्या काही कल्याणकारी संघटना आहेत त्या पाचशे किलोमीटर सोलर पॅनल खरेदीवर अनुदानाच्या माध्यमातून लाभ देत आहेत. परंतु प्रत्येक घराकरिता जास्तीत जास्त दहा किलो वॅट सोलर पॅनल ची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून एकूण जो काही खर्च आहे त्या खर्चापैकी अनुदानाची रक्कम वगळली तर उर्वरित रक्कम ही जे कोणी नागरिक सोलर पॅनल खरेदी करू इच्छिणार असतील त्यांना द्यावी लागणार आहे…

योजनेचा लाभ घेण्यासाठी या वेबसाईटवर करा अर्ज

आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची बाब सांगू इच्छितो ती म्हणजे योजनेच्या माध्यमातून जे कोणी नागरिक अनुदानाचा लाभ घेण्याकरिता इच्छुक असतील त्यांनी कंपनीच्या अधिकृत संस्थेची स्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. यासोबतच अधिकृत जे कोणी वेंडर असतील त्यांच्या माध्यमातूनच इच्छुक ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवता येईल.

योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. त्यासाठी पुढील केलेल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.www.mahadiscom/consumerportal/renewable energy portal/solar rooftop

Leave a Comment