राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ऐवजी या पर्यायी पेन्शन योजना लागु करण्याचा फडणवीसांचा विचार !

Spread the love

राज्य कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता संप करत आहेत , दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री जुनी पेन्शनला पर्यायी योजना शोधण्यामध्ये व्यस्त आहेत .राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येईल , याकरीता जुनी पेन्शनला पर्यायी पेन्शन योजना शोधण्याचा विचार राज्याचे उपमुख्यमंत्री करत आहेत .

यामध्ये जुनी पेन्शनला प्रमुख पर्यायी पेन्शन योजना पुढीलप्रमाणे पाहुयात –

१ ) पेन्शन करीता कर्मचाऱ्यांकडून योगदार – जुनी पेन्शन योजनांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे योगदान घेण्यात येत नाहीत . जुनी पेन्शन मध्ये कर्मचाऱ्यांना बचतीची सवय लागावी याकरीता भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या योगदानानुसार बचत करण्यात येते . या बचतीवर शासनांकडून बँक मुदत ठेव पेक्षा अधिक व्याज देण्यात येते . आंध्र प्रदेश राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनला पर्यायी पेन्शन योजना म्हणून कर्मचारी योगदानातुन पेन्शन दिली जाते . जे कि कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या 34 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते .

जुनी पेन्शन करीता कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही स्वरुपाचे योगदान घेण्यात येत नाही , जर जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचाऱ्यांना लाभ द्यायचा असल्यास , कर्मचाऱ्यांकडून योगदान घेण्याचा उत्तम पर्याय शासनाकडे असल्याचे तज्ञांचे मत आहे .

२ ) राष्ट्रीय पेन्शन योजनंमध्ये पेन्शनची निश्चिती – राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांकडून मुळ वेतन व महागाई भत्ताच्या 10 टक्के रक्कम NPS मध्ये जमा करण्यात येते . सदरची रक्कम ही शेअर बाजाराच्या Equity शेअरमध्ये गुंतविले जाते . यामुळे जमा रक्कमेची जोखिम अधिकच वाढते . काही वेळा जमा रक्कमेवर वजा परतावा मिळतो , म्हणजेच कर्मचाऱ्यांना नुकसान सहन करावा लागते . यामुळे जुनी पेन्शनला पर्याय म्हणून राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल आवश्यक तो बदल करणे आवश्यक आहे . यामध्ये स्थिर व्याजरद प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या जमा योगदानावर व्याज दिल्यास किमान पेन्शन रक्कम सहज निश्चित करता येईल .

३) पेन्शनची हमी – केंद्र सरकारने सुरु केलेल्या अटल पेन्शन योजना तसेच भारतीय आयुर्विमा मार्फत राबविण्यात येणाऱ्या पेन्शन योजनांप्रमाणे पेन्शनची हमी मिळेल अशा पद्धतीने राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल कराण्याचा सल्ला काही अर्थतज्ञांने दिले आहेत .

कर्मचारी विषयक / पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment