राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात , बैठकीमध्ये या तिन प्रमुख मागण्या मान्य ! जाणून घ्या बैठकीचे सविस्तर इतिवृत्त !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च 2023 पासून जुनी पेन्शन या प्रमुख मागणींकरीता बेमुद संप सुरु होता .हा संप दि.14 मार्च पासून 20 मार्च 2023 पर्यंत सात दिवस चालला . यावर दि.20 मार्च 2023 रोजी राज्य शासनाने बैठक घेवून , सकारात्मक निर्णय घेण्यात आला .मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचे सविस्तर इतिवृत्त पुढीलप्रमाणे पाहूयात .

राज्य शासनाच्या विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.20.03.2023 रोजी दुपारी 2.00 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली होती . या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला .

या बैठकीमध्ये तीन महत्वपुर्ण मागण्या मा.मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे .राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचारी निधन पावल्यास त्याच्या कुटुंबियांस कुटुंब निवृत्ती वेतन व ग्रॅच्युईटी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जूनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समितीचे गठन करुन खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .

त्याचबरोबर जून्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याचे धोरण तत्व म्हणून मान्य करण्याचे लेखी इतिवृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहेत . राज्यातील नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजने प्रमाणे अनुज्ञेय असलेला लाभ मिळेल असे स्पष्ट केले आहे .थोडक्यात सांगायचे झाल्यास , जूनी पेन्शन योजना हे नांव बदलून वेगळ्या शीर्षाखाली जून्या पेन्शन इतकाच अधिकृत्त लाभ राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांस मिळणार असल्याचे मा.मुख्यमंत्र्यांमार्फत स्पष्ट करण्यात आले आहेत .

कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment