आनंदाची बातमी : राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन संदर्भात उद्या होणार निर्णय ! बैठकीचे आयोजन !

Spread the love

राज्यातील राजपत्रित अधिकारी सोबत उद्या दुपारी 12 वाजता राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी यांची राज्य सरकार सोबत बैठक होणार आहे . या बैठकीमध्ये राज्याचे मुख्य सचिव त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत .

राज्यातील राजपत्रित अधिकारी दिनांक 28 मार्च 2023 पासून राज्य कर्मचाऱ्यांच्या सुरू असणाऱ्या संपामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याने , राज्य शासनाने राजपत्रित अधिकारी महासंघाची उद्या बैठक आयोजित करण्यात आलेली आहे . कारण राज्यातील राजपत्रित अधिकारीच संपावर उतरल्यास राज्य शासनाची संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होईल . यामुळे जुनी पेन्शन संदर्भात योग्य तो निर्णय घेणे राज्य शासनास भाग पडणार आहे .

दिनांक 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याचे औचित्य साधून , राज्य शासनाने ‘ आनंदाचा शिधा ‘ ही मोहीम राबवली आहे .परंतु कर्मचारी संपावर असल्याने ही मोहीम असफल होण्याची शक्यता आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या अगोदरच जुनी पेन्शन संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

उद्याच्या बैठकी संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून पत्रक निर्गमित झालेले असून , या संपामुळे कोणकोणत्या गोष्टीवर विपरीत परिणाम झालेला आहे , व त्याचा नागरिकांना काय ताण पडत आहे या संदर्भात माहिती मागवली आहे .

कर्मचाऱ्यांच्या संपा संदर्भात विरोधक देखील आक्रमक झाले असून , राज्य शासन पूर्णपणे कोंडीत सापडलेले आहे . दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होत असताना दिसून येत असल्याने , राज्य शासनाला जुनी पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेणे भाग पडणार आहे .

कर्मचारी विषयक, भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment