महाराष्ट्र राज्य सरकार राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन अजिबात लागू करणार नाही असे , वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधिमंडळात मांडले आहे .सध्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे , यामध्येच आता राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी कर्मचाऱ्यांना समर्थन न करता स्पष्ट विरोध करत आहेत .
आज विधान सभेमध्ये बोलत असताना ,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, राज्य शासन दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 155,000/- कोटी रुपये खर्च करण्यात येते , तर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर 36,000/- कोटी रुपये खर्च होतो .राज्याला दरवर्षी मिळणारा महसूलचा विचार केला असता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे शक्य नाही असे स्पष्ट केले आहे .
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर आता विरोधी पक्ष नेते देखील जुनी पेन्शनला विरोध दर्शवत असल्याने विधान सभेमध्ये कर्मचाऱ्यांची वाचा फोडणारे कुणीच नसल्याचे स्पष्ट होत आहे .
यामुळे आता कर्मचारी अधिकच संतापले आहेत , आज राज्य कर्मचाऱ्यांचा संपाचा पहिला दिवस आहे .राज्य शासनाकडून संपाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत नसल्याने राज्य कर्मचारी संप बेमुदत पुढे चालू ठेवणार असल्याची बातमी समोर येत आहे .
कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करिता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !